बातम्या

जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू

Prohibition order in force till July 14 in the district


By nisha patil - 6/28/2024 7:59:29 PM
Share This News:



जिल्ह्यात विविध पक्ष, संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत.  यावेळी जिल्ह्य़ात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 30 जून 2024 रोजी रात्री 1 ते 14 जुलै 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी दिले आहेत.

हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही. 


जिल्ह्यात 14 जुलैपर्यंत बंदी आदेश लागू