बातम्या

जिल्ह्यात 28 जूनपर्यंत बंदी आदेश लागू

Prohibition order in force till June 28 in the district


By nisha patil - 12/6/2024 1:31:41 PM
Share This News:



जिल्ह्यात बकरी ईद तसेच मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस, सण इत्यादी साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. यावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जिल्ह्यामध्ये दिनांक 14 जून  रोजी रात्री 00.01 ते 28 जून रोजी रात्री 24 वाजेपर्यंत  बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.
     

 हा हुकूम ज्या सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही. 


जिल्ह्यात 28 जूनपर्यंत बंदी आदेश लागू