राजकीय
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
By nisha patil - 11/15/2024 11:00:44 PM
Share This News:
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
कोल्हापूर भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघासाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर 2024 रोजी निनिर्दिष्ट ठिकाणी मतदान मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून ही निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघासाठी दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या उमेदवारांच्या सोबत त्यांचे समर्थक, वाहने, कार्यकर्ते् हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरीता निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील मतदार संघासाठी नेमलेले मतदान केंद्र व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान केंद्रापासून नेमून दिलेल्या परिसरात मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून व मतदाना दिवशी म्हणजे दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यातील मतदान केंद्राच्या परिसरामध्ये पुढील नमुद कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केले आहेत.
मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरामध्ये राजकीय पक्षांचे बुथ स्थापित करणे, प्रचार साहित्य बाळगणे अथवा वापरणे, मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, वायरलेस सेट इत्यादी बाळगणे, वापरणे अथवा मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे.
(भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून), मतदान केंद्रातील मतदान प्रतिनिधी वा इतर प्रतिनिधी यांनी मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरणे किंवा फोटो काढणे अथवा चित्रीकरण करणे तसेच मतदानाच्या गोपनियतेचा भंग होईल अशी कृती करणे, मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तिने कोणत्याही प्रकारची शस्त्रे (शस्त्र अधिनियम 1959 मध्ये नमुद केल्याप्रमाणे) बाळगणे. (सुरक्षेच्या कारणास्तव नेमलेले पोलीस अधिकारी,कर्मचारी वगळून.) यास मनाई करण्यात आल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
|