बातम्या

प्रखर हिंदुत्ववादी नेते नारायणराव कदम यांचे निधन

Prominent Hindu leader Narayanarao Kadam passed away


By nisha patil - 4/7/2023 2:01:04 PM
Share This News:



हिंदू एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक प्रणेते प्रखर हिंदुत्ववादी नेते नारायणराव कदम यांचं आज पहाटे निधन झालं.सांगली इथ वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखंड महाराष्ट्रभर त्यांनी हिंदू राष्ट्र आणि हिंदू धर्म समाजवाद या विषयावर बोलून तरुणांना प्रेरणा दिली आणि त्याचबरोबर हिंदू एकता आंदोलन ही संघटना वाढवली. नारायण कदम यांची निधनाची बातमी समजताच अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे हिंदू एकता आंदोलन संघटनेचा एक विचार हरपला असल्याची प्रतिक्रिया विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली.


प्रखर हिंदुत्ववादी नेते नारायणराव कदम यांचे निधन