बातम्या
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ग्रामपंचायतींमध्ये सारथी योजनांचा प्रचार व प्रसार
By nisha patil - 1/28/2025 9:52:57 AM
Share This News:
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ग्रामपंचायतींमध्ये सारथी योजनांचा प्रचार व प्रसार
ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) आणि MKCL यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2025 रोजी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी विविध ग्रामपंचायतींमध्ये जाऊन ग्रामसभांमध्ये सारथी अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली. या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला व या योजनांबद्दल उत्सुकता दर्शवली.
.%5B4%5D.jpg)
विद्यार्थ्यांनी मराठा, कुणबी-मराठा समाजातील 18 वर्षे पूर्ण व 10वी पास पात्र लाभार्थ्यांसाठी मोफत संगणक कौशल्य योजना आणि इतर योजनांची माहिती सोप्या भाषेत नागरिकांपर्यंत पोहोचवली. अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती त्यांनी स्पष्ट केली.
.%5B4%5D.jpg)
कार्यक्रमादरम्यान माहिती पत्रके वाटप करण्यात आली, तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक करत, यामुळे योजनांचा लाभ घेणे सोपे झाल्याचे सांगितले.
.%5B4%5D.jpg)
सदर उपक्रमात तेज कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या सौ. वर्षा कदम, सौ. वर्षा चव्हाण, सौ. रोहिणी जाधव, कु. पूजा गवाळकर, कु. अर्पिता सासणे, आणि सौ. निवेदिता पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. या यशस्वी उपक्रमासाठी सारथीच्या अप्पर जिल्हाधिकारी मा. श्रीमती किरण कुलकर्णी आणि MKCL चे जिल्हा समन्वयक श्री. सचिन भोईटे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जागरूकता वाढून योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी त्वरित अर्ज करण्याचा निर्धार केला आहे. 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला आहे.
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ग्रामपंचायतींमध्ये सारथी योजनांचा प्रचार व प्रसार
|