बातम्या
शिक्षकांच्या ड्रेस कोडला कोल्हापुरातून विरोध
By nisha patil - 3/26/2024 3:36:47 PM
Share This News:
शासनाने १५ मार्च २०२४ रोजी शिक्षकांचा पेहराव व ड्रेस कोड बाबत आदेश दिले आहेत. या आदेशाला विरोध करण्यासाठी म्हणून २८ मार्च रोजी सर्व शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व मनपा प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीने केले आहे.महाराष्ट्र सरकारने राज्यातील खासगी आणि सरकारी शाळांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. यामुळे आता सर्व शिक्षकांना शाळांमध्ये टी शर्ट, जीन्स परिधान करता येणार नाही. तसेच प्रिन्ट आणि डिझाइन असलेले कपडे वापरता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश काढले आहेत. हा आदेश फक्त सरकारी नाही तर खासगी शाळांमध्ये लागू असणार आहे. यामुळे सर्वच शिक्षकांना शाळांमध्ये सोबर कपडे परिधान करावे लागणार आहेत.
या निर्णयावर कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्यावतीने निषेध व्यक्त केला जात आहे सध्या जगाच्या अनेक कक्षा वृद्धांवत असताना शिक्षकांना विविध बंधन घालणे हे योग्य नाही. शिक्षक शाळेत जाताना योग्य समाजमान्य पेहराव करूनच शाळेत जातात असे असताना ड्रेस कोड च्या नावा खाली शिक्षकांना पेहरावा बाबत बंधने घालणे हे काळाला धरून नाही. यापूर्वी शासने शिक्षकाचा फोटो वर्गात लावण्याचा निर्णय घेतला होता. त्याला ही सर्व शिक्षक संघटनानी तीव्र विरोध केला होता व तो निर्णय हाणून पाडला आहे.
तरी येत्या गुरुवारी २८ तारखेला शहर व जिल्ह्यातील शिक्षकांनी शाळेत जिन्स घालून यावे असे आवाहन सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीने भरत रसाळे , सुधाकर सावंत , राजेंद्र कोरे , संतोष आयरे, विलास पिंगळे , दिलीप माने यांनी केले आहे.,
शिक्षकांच्या ड्रेस कोडला कोल्हापुरातून विरोध
|