बातम्या

केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपची निदर्शने..

Protests against Arrest of Kejriwal


By nisha patil - 3/23/2024 5:44:51 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: प्रतिनिधी कोल्हापुरात सुद्धा 'आप'च्या कार्यकर्त्यांचा उद्रेक दिसून आला. कोल्हापुरातील 'आप'च्या कार्यकर्त्यांचा मोर्चा भाजप कार्यालयाच्या दिशेने निघाला आणि पोलिसांनी अडवला, जोर जबरदस्ती करून पोलिसांनी कार्यकर्त्यांना पोलीस व्हॅनमध्ये अक्षरशः कोंबले.  कार्यकर्त्यांची उपस्थिती त्यांचा आक्रमकपणा, घोषणाबाजी, व्यवस्थेच्या बद्दलचा संताप हे सगळं पावलो पावली दिसत होत. पुढच्या फळीतील जवळपास 25 जणांवर केसेस दाखल झाल्या.(फोटोतल्या सगळ्यांच्यावर) आप'च्या सर्वच कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की अरविंद केजरीवाल एकटे नाहीत, आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ना कुणाच्या चेहऱ्यावर भीती होती, ना काळजी. उलट इथून पुढे देखील अशाच आक्रमकपणे संघर्ष पुढे सुरू ठेवण्याचा निश्चय प्रत्येकानं बोलून दाखवला.
 

मला खात्री आहे इथून पुढे या कार्यकर्त्यांच्या बळावर आम आदमी पार्टी कोल्हापूर बरोबरच पूर्ण महाराष्ट्रात विजयाचा झेंडा फडकवेल...


केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आपची निदर्शने..