बातम्या

विरोधी खासदार निलंबन: इंडिया तर्फे बिंदू चौकात निषेध निदर्शने

Protests by India at Bindu Chowk


By nisha patil - 12/22/2023 1:40:11 PM
Share This News:



विरोधी खासदार निलंबन: इंडिया तर्फे बिंदू चौकात निषेध निदर्शने

 मोदीं सरकारच करायच काय खाली डोक धर पाय

भाजपच्या वतीने फिरणारा रथ आडवायचा - आमदार सतेज पाटील

संसदेची सुरक्षा राखण्यात आलेले अपयश आणि संबंधित प्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी केल्याबद्दल आजवर १४१ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आल आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिंदू चौक इथ भाजप सरकार विरोधात निदर्शन करण्यात आलीत. यावेळी आंदोलकांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला

१४ डिसेंबर रोजी काही तरुणांनी भाजप खासदारांच्या पासवर संसदेत प्रवेश करून स्मोक बॉम्ब फोडले होते त्यामुळे संसद सुरक्षिततेचा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होतं यावर इंडिया आघाडीकडून संसदेची सुरक्षा राखण्यात आलेले अपयश आणि संबंधित प्रश्नी गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी केल्याबद्दल आजवर १४१ विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आल आहे.केंद्रातील भाजप सरकारच्या या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी आज बिंदू चौक इथे इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने निदर्शना करण्यात आली आहेत. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी सद्या देशातील लोकशाही धोक्यात आली असून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे.त्यामुळं लोकशाही आबाधित राहण्यासाठी इंडिया आघाडी एकत्र येवून हा लढा देत असल्याचं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे,

 

राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष व्ही  बी पाटील,आर के पोवार,आपचे संदीप देसाई,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे
डॉक्टर उदय नारकर,शेकापचे बाबुराव कदम,जनता दलाचे शिवाजीराव परुळेकर यांनीही मनोगत व्यक्त केलं.

 

यावेळी आमदार ऋतुराज पाटील,आमदार जयश्री जाधव, जयंत आसगावकर, मजी महापौर निलोफर आजरेकर,माजी नगरसेवक सचिन चव्हाण,शारंगधर देशमुख,अर्जुन माने,प्रताप जाधव, कोम्रेड सतीशचंद्र कांबळे,प्रतीज्ञा उत्तुरें, भारती पोवार यांच्यासह इंडिया आघाडीतील.सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते,


विरोधी खासदार निलंबन: इंडिया तर्फे बिंदू चौकात निषेध निदर्शने