बातम्या

शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

Provide 35 lakhs for swimming pool at Shivaji Stadium


By nisha patil - 6/21/2024 6:33:07 PM
Share This News:



शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली सूचना

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाचा सर्वांगीण विकासाठी 35 लाख रुपय निधीची तरतूद करावी अशी सूचना आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास कामाबाबत आज आमदार जयश्री जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन चर्चा केली. 

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे. स्टेडियमचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी  सातत्याने पाठपुरावा केला. यामुळे शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी एक कोटी ९४ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. याचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाची दुरावस्था झाली आहे. यामुळे अनेक जलतरणपटू सराव करताना जखमी झाले आहेत, अशा तक्रारी जलतरणपट्टू व नागरिकांनी माझ्याकडे केली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काच्या असणाऱ्या जलतरण तलावाचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे असून त्यासाठी 35 लाख रुपयांचा निधी निधीची मागणी यापूर्वीच केली होती. मात्र याबाबत अद्याप निधीची तरतूद झालेली नाही. तरी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्वरित निधीची तरतूद करावी व तलावाच्या सर्वांगीण विकासाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना केली आहे.


शिवाजी स्टेडियम येथील जलतरण तलावासाठी 35 लाखाची तरतूद करा : आमदार जयश्री चंद्रकांत जाधव