बातम्या
कोल्हापुरातील नाट्य प्रयोग अखंडित सुरु राहण्यासाठी पर्यायी सभागृह उपलब्ध करा: राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी यांना सूचना
By nisha patil - 8/14/2024 10:36:58 PM
Share This News:
कोल्हापुर दि. १४: संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या दुर्घटनेमुळे कोल्हापूरच्या कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. नाट्यगृहाची पुर्नबांधणीच्या प्रयत्नांमध्ये शासन कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन कलाकारांना दिलासा दिला असून, २० कोटी रुपये निधीची घोषणा केली आहे. परंतु, नाट्यगृहाच्या गैरसोयीमुळे कलाकार व व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी जिल्हा प्रशासनाला पर्यायी सभागृह उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापुरातील नाट्य प्रयोगांचे केंद्र असून, यावर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा अवलंबून आहेत. दुर्घटनेमुळे या कार्यक्रमांमध्ये खंड पडू नये म्हणून पर्यायी सभागृह उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे राजेश क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना पत्राद्वारे कळवले आहे.
कोल्हापुरातील नाट्य प्रयोग अखंडित सुरु राहण्यासाठी पर्यायी सभागृह उपलब्ध करा: राजेश क्षीरसागर यांची जिल्हाधिकारी यांना सूचना
|