बातम्या
जलजीवन मधून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करा
By nisha patil - 11/1/2024 6:33:06 PM
Share This News:
कोल्हापूर : जलजीवन मशीनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध सुरक्षित व शाश्वत पाणीपुरवठा झाला पाहिजे त्यामुळे लोकांना गुणवत्तेचे पाणी मिळाले पाहिजे असा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक संतोष पाटील यांनी आज दिल्या. जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनर्फे जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता कार्यशाळा झाली यावेळी ते बोलत होते.
श्री पाटील म्हणाले, ग्रामीण भागात पाणीपुरवठा करताना काळजी घेतली पाहिजे. नद्यांमध्ये सांडपाणी मिसळत आहे त्यामुळे हे पाणी दूषित होत आहे. यासाठी वर्षातून दोन पेक्षा जास्त वेळा पाण्याच्या गुणवत्ता तपासली पाहिजे. पाच वर्षात वारंवार दूषित आलेले स्त्रोतांची यादी तयार केली आहे. त्यानुसार दूषित पाणी होणार स्त्रोत कायमस्वरूपी बंद केले आहेत. असे स्रोत केंद्र सरकारच्या संकेतस्थळावरून कमी केले पाहिजेत. या आठवड्यात जलजीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचना, पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण मार्गदर्शक सूचना, जलसुरक्षाकाचा शासन निर्णय, एफटी के तपासणी पाणी
गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक ,आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक ,वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तालुका पातळीवर कार्यशाळा घ्यावी.
यावेळी जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट ,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रसाद बारटके ,अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय रणवीर उपस्थित होते.
जलजीवन मधून ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पाणीपुरवठा करा
|