राजकीय

ताराबाई गार्डनमध्ये सुविधा द्या - आम आदमी पार्टीची मागणी

Provide facilities in Tarabai Garden  Aam Aadmi Party demand


By Administrator - 11/12/2024 4:14:32 PM
Share This News:



ताराबाई गार्डनमध्ये सुविधा द्या - आम आदमी पार्टीची मागणी

कोल्हापूर: शहरातील महत्त्वाच्या ताराबाई गार्डनच्या सुधारणा व सुविधांसाठी आम आदमी पार्टीने महापालिकेकडे ठोस मागणी केली आहे. उद्यानात येणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून या उद्यानाकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने येथील सोयी-सुविधा अडचणींचा विषय बनला आहे. आपच्या शहराध्यक्ष उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांना निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

मागण्यात आलेल्या सुधारणा:
ताराबाई गार्डनमधील लँडस्केपींगसाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत कामे होत असली, तरी लहान मुलांचे खेळ आणि योग वर्गांना अडचण होणार असल्याने डिझाईन सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे. उद्यानातील झाडांचे संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी देशी झाडे व फुलझाडे लावावीत, तसेच झाडांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी अधिक कर्मचारी नेमावेत, अशीही विनंती करण्यात आली.

उद्यानात उभारलेली ट्रॅफिक सिग्नल प्रणाली गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे. ती पुन्हा कार्यान्वित करून आरटीओच्या मदतीने वाहतूक नियम प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच झाडांच्या नावांसाठी पाट्या लावण्यात याव्यात


ताराबाई गार्डनमध्ये सुविधा द्या - आम आदमी पार्टीची मागणी