बातम्या
खासबाग सांस्कृतिक संकुलासाठी 10 कोटींची तरतूद – आमदार राजेश क्षीरसागर
By nisha patil - 8/2/2025 7:52:56 PM
Share This News:
खासबाग सांस्कृतिक संकुलासाठी 10 कोटींची तरतूद – आमदार राजेश क्षीरसागर
कोल्हापूर (दि. 08) – कोल्हापूरच्या कला, क्रीडा आणि कुस्ती परंपरेला साजेसे खासबाग सांस्कृतिक संकुल मिरजकर तिकटी येथे उभारले जाणार आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागामार्फत 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
संकुलात कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेवर विशेष दालन, कलाक्षेत्राचे संग्रहालय आणि पर्यटकांसाठी आकर्षक व्यवस्थापन असेल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे कोल्हापूरच्या सांस्कृतिक ठेव्याला नवी ओळख मिळेल, असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
खासबाग सांस्कृतिक संकुलासाठी 10 कोटींची तरतूद – आमदार राजेश क्षीरसागर
|