बातम्या

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद : आमदार जयश्री जाधव

Provision of 40 crore rupees for Karveer Niwasini Shree Ambabai Temple Pilgrimage Development Scheme

By nisha patil - 8/12/2023 3:26:31 PM
Share This News:

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद : आमदार जयश्री जाधव  

कोल्हापूर : श्री क्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदीर कोल्हापूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली असल्याची माहिती आमदार जयश्री जाधव यांनी दिली. यामुळे तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामास गती येईल असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.
 
कोल्हापूरच्या पर्यटन आणि धार्मिक महत्त्वाच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास निधी मंजूर व्हावा यासाठी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता व निवेदन दिले होते. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशन व हिवाळी अधिवेशनात याबाबत लक्षवेधीतून शासनाचे लक्ष वेधले होते. यामुळे चालू हिवाळी अधिवेशनात श्री क्षेत्र महालक्ष्मी (करवीर निवासिनी अंबाबाई) मंदीर कोल्हापूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामास गती येईल असा विश्वास आमदार जाधव यांनी व्यक्त केला.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास चाळीस कोटी रुपय निधीची तरतूद : आमदार जयश्री जाधव