बातम्या

जप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहिर लिलाव

Public auction of seized immovable property


By nisha patil - 6/19/2024 8:35:25 PM
Share This News:



जप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहिर लिलाव
 

 कोल्हापूर,  अक्षता साडी सेंटर प्रो. प्रा. सागर बालचंद खियाणी यांच्याकडून एकूण रक्कम 2 लाख 4 हजार 48 रुपये इतकी रक्कम वसुल करण्यासाठी ग्रामपंचायत गांधीनगर करवीर येथील श्रीमती लक्ष्मीबाई बालचंद खियाणी यांच्या मालकीची मिळकत क्रमांक 2713 क्षेत्रफळ 77.97 (839.28 चौ.फु.) कसुरदार यांच्या हिस्सेपुर्ती स्थावर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये विक्रीसाठी निश्चित केलेल्या दिवसापूर्वी पुर्वोवत एकूण रक्कम रु. 2 लाख 4 हजार 48 इतकी भरली नाही तर नमुद मालमत्ता तहसिलदार कार्यालय करवीर, कोल्हापूर दि. 16 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वा. किंवा दुपारी 3 वाजता जाहिर लिलाव करुन विकली जाईल, अशी माहिती करवीर तहसिलदारांनी दिली आहे.
 

लिलावाच्या शर्ती खालीलप्रमाणे-
ग्रामपंचायत गांधीनगर ता. करवीर, जि. कोल्हापूर या मालमत्तेची मुल्यांकन किंमत 17 लाख 76 हजार 704 रुपये  इतकी असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही. लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल. ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने १/४ रक्कम तात्काळ भरावयाची आहे.लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलावधारकांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित ३/४ रक्कम जमा करावयाची आहे. वरील अट क्र. ४ मधील पूर्तता न केल्यास फेरलिलाव केला जाईल व त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल. थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर ३० दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारल्याचा खर्च इत्यादी खर्च जमा करुन लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याच्या नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे त्यास बोली रक्कमेच्या ५ टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल. त्या आधारे लिलावधारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल. 


जप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहिर लिलाव