बातम्या
150 सायकलस्वारांच्या सहभागातून मतदानाबाबत जनजागृती
By nisha patil - 5/11/2024 10:00:59 PM
Share This News:
येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आणि मतदान जनजागृतीसाठी 5 नोव्हेंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हयात एकूण 3 हजार 452 मतदान केंद्र आहेत. प्रत्यक मतदाराने 20 नोव्हेंबर रोजी मतदान करावे, जिल्ह्याची उच्चांकी मतदानाची परंपरा असून ही परंपरा कायम ठेवून लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा उच्चांकी मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले. मतदान करण्यासाठीची शपथ सर्व उपस्थितांना दिली व हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात केली. या रॅलीमध्ये 150 सायकलस्वारांनी आपला सहभाग नोंदवून मतदानाबाबत जनजागृती केली.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरूवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, सिपीआर चौक, भवानी मंडप,बिंदू चौक, उमा टॉकीज रोड, शाहू मिल चौक, विजय बेकरी, टाकाळा रोड, टाकाळा चौक, उड्डाण पूल, कावळा नाका, महाराजा हॉटेल चौक, कारंडे मळा, महासैनिक दरबार हॉल, भगवा चौक, एस. पी. ऑफिस चौक, महावीर कॉलेजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या रॅलीची सांगता झाली. या मार्गावरून 15 किमी अंतर सहभागी सायकलस्वारांनी पार केले. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकपट्टूना टी शर्ट देण्यात आले.
या सायकल रॅलीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर उत्तर डॉ.संपत खिलारी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, स्वीपचे नोडल अधिकारी निळकंठ खरे, माध्यम कक्ष नोडल अधिकारी तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी आपला सहभाग नोंदविला. याच पध्दतीने कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजी, कागल, गडहिंग्लज, पन्हाळा व गारगोटी या प्रमुख शहरांमध्ये सायकल रॅलीचे आयोजन करून मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली.
या रॅलीदरम्यान सहभागी सायकलस्वारांनी मतदान करणेबाबत नागरिकांना आवाहन केले.
यावेळी सहभागींनी दिलेल्या प्रतिक्रिया-
80 टक्कयाहून अधिक मतदान करण्यासाठी या सोहळयामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे व मतदानाचा मुलभूत हक्क बजावावा – डॉ. प्रकाश शाळबिद्रे
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हयातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही अबाधित ठेवावी . – महिपती संकपाळ.
20 नोव्हेंबरला प्रत्येक कोल्हापूरकरांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून योग्य प्रतिनिधी निवडावा – प्रदिप कुलकर्णी.
150 सायकलस्वारांच्या सहभागातून मतदानाबाबत जनजागृती
|