बातम्या

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम

Public awareness campaign to curb corruption


By nisha patil - 7/11/2023 9:19:23 PM
Share This News:



भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम 

दक्षता जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

एअर विंग एनसीसी विभाग यांचा सक्रिय सहभाग


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर तसेच माध्यमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या रॅलीमध्ये प्रायव्हेट हायस्कूल मधील एअर विंग एनसीसी विभाग यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता भ्रष्टाचार ला आळा घालण्यासाठी ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आलेली होती 

 कोल्हापूर मधील लाचलुजपत प्रतिबंध विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या वतीने दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये एअर रिंग एनसीसी विभाग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ही जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती
पोलीस उपअधीक्षक सरदार नाळेसाहेब यांनी आपल्या एनसीसी कॅडेट्स  चे कौतुक केले तसेच शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीबद्दल विशेष उल्लेख केला. रॅली मेन राजाराम हायस्कूल या ठिकाणापासून सुरू होऊन जैन बोर्डिंग या ठिकाणी त्याची सांगता झाली.*   यावेळी प्रायव्हेट हायस्कूलच्या मुख्याध्यापिका  व्ही एल डेळेकर  उपमुख्याध्यापक जी एस जांभळीकर पर्यवेक्षक पी एम जोशी तसेच जिमखाना प्रमुख  गानबावले यांचे मार्गदर्शन लाभले.*


भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनजागृती मोहीम