बातम्या

खेडे गावातील शिवसेना कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश

Public entry of Shiv Sena workers from Khede village into Jansuraj Shakti Party


By nisha patil - 10/22/2024 6:42:35 PM
Share This News:



खेडे (ता. शाहूवाडी) येथील शिवसेना (उबाठा) गटाच्या विद्यमान सरपंच सौ. अनिता बाबाराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आज आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

या कार्यक्रमात उपसरपंच अनिता नारायण मांडवकर, ग्रामपंचायत सदस्य बाबाराम भाऊ कांबळे व माजी उपसरपंच कृष्णात मारुती मांडवकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन पाटील (आप्पा) आणि अन्य मान्यवर उपस्थित होते, ज्यांनी या नवीन प्रवेशाचे स्वागत केले आणि आगामी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


खेडे गावातील शिवसेना कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश