बातम्या

"मांडवकरवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश"

Public entry of Shiv Sena workers into Jansuraj Shakti Party at Mandwakarwadi


By nisha patil - 9/10/2024 8:41:07 PM
Share This News:



परळी तालुक्यातील मांडवकरवाडी येथे आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश समारंभात रामदास लावंगरे, चंद्रकांत वडीकर, शहाजी जाधव, विलास वडीकर, विनायक लावंगरे (मेजर), शहाजी मांडवकर (मेजर) आणि अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर), नामदेव पाटील - पिशवी, माजी उपसरपंच बाळू खोत, दिनकर मांडवकर, नाथाजी पाटील, आकाराम जाधव, अशोक लावंगरे, दिनकर भोसले, मारुती डिगे, संदीप चौगले, रघुनाथ पाटील, कृष्णात गुरव, सुरेश दाष्टे, आणि अजित लावंगरे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

या प्रवेशामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची संघटना अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.


"मांडवकरवाडी येथे शिवसेना कार्यकर्त्यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश"