बातम्या
पन्हाळा प्रांतकार्यालयावर गोसावी समाजाचा जन आक्रोश मोर्चा.
By nisha patil - 8/1/2025 6:24:01 PM
Share This News:
पन्हाळा प्रांतकार्यालयावर गोसावी समाजाचा जन आक्रोश मोर्चा.
पन्हाळा प्रतिनिधी , शहाबाज मुजावर, मोर्चाची सुरुवात बाजीप्रभू चौक येथून झाली. यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यामध्ये गोसावी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ,नराधमाला फाशी झालीच पाहिजे ,अशा घोषणा देत प्रांत कार्यालय जवळ जन आक्रोश मोर्चा आला. मोर्चेचे रूपांतर सभेत झाले. दि.२५/१२/२०२४ रोजी, राजगुरूनगर, जि. पुणे या ठिकाणी भटके गोसावी समाजामधील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून निघृण हत्या करण्यात आलेली आहे. हे कुटूंब भटके गोसावी समाजातील असून रोजी रोटीसाठी पोट भरण्याकरिता भटकंती करत असताना. काही दिवसापासून राजगुरूनगर, जि. पुणे या ठिकाणी वास्तव्यास आहे. पिडीत कुटंबाच्या शेजारी राहणाऱ्या नराधमांनी दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून त्यांची बॅरल मध्ये बुडवून हत्या केलेली आहे. सदर घटना ही माणुसकीला काळिमा फासणारी असून याचा आम्ही पन्हाळा व शाहुवाडी तालुका गोसावी समाज यांच्यावतीने जाहीर निषेध करत आहोत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाने अशी घटना करणाऱ्या नराधमांना कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा दयावी.
पिडीत कुटूंबास न्याय मिळवून दयावा वरील तपास हा STI किंवा CBI मार्फत होवून सदर तपास हा पारदर्शी व्हावा सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस तात्काळ फाशी देण्यात यावी आशी मागणी चे निवेदन पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्याकडे देण्यात आले. तसेच आझाद मैदान या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा विराट मोर्चा निघणार आहे.आसा निर्धार गोसावी समाजा केला आहे.तसेच राज्यभर संतापाची लाट तयार झाली आहे . आरोपीला शिक्षा झाल्याशिवाय गोसावी समाज माघार घेणार नाही असे यावेळी गोसावी समाजाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार डॉ विनय कोरे, भाजप महिला मोर्चा प्रदेश सचिव डॉ. स्वाती दिपक पाटील यांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग नोंदवून गोसावी समाजाला मार्गदर्शन केले. समस्त गोसावी समाजाकडून सचिन जाधव ,भाजपा पन्हाळा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले, भाजपा प्रदेशाध्यक्ष अजय चौगले,भारतीय दलित महासंघाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष श्रीकांत कांबळे(आप्पा) राष्ट्रीय बहुजन संघ अध्यक्ष राजीव सोरटे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल पन्हाळा सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले ,उपनिरीक्षक महेश कोंडुभौरी ,गोपनिय पोलीस सचिन पाटील, गोसावी समाजाच्या वतीने सिताराम पोवर, ज्योतीराम जाधव, युवराज गोसावी, सर्जेराव पोवार, सागर गोसावी, प्रताप जाधव, दादासो पडियार, सुनील पडियार, अशोक गोसावी ,त्याचबरोबर पन्हाळा शाहूवाडी गोसावी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होतात.
पन्हाळा प्रांतकार्यालयावर गोसावी समाजाचा जन आक्रोश मोर्चा.
|