बातम्या
कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा...!
By neeta - 3/15/2024 1:34:38 PM
Share This News:
कोल्हापूर : एकीकडे राज्यात लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र वारं चालू असतानाच दुसरीकडे कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ही सर्वत्र लोकसभेचा डंका वाजत आहे सध्या कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा सुरु आहे. छत्रपती शाहू महाराज महाविकास आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवणार असण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरतील असे बोलले जातेय. यातच आता कोल्हापुरांत शाहू प्रेमींकडून छत्रपती शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या आदीच कोल्हापुरात ठिकठिकाणी शाहू महारांजाच्या जाहीर पाठिंब्याचे बॅनर्स झळकताना दिसत आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांचा कौल शाहू महाराजांच्या बाजूने लागणार का ? हे येत्या काही दिवसात आपलयाला कळेलच...
कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराजांना जाहीर पाठिंबा...!
|