राजकीय
तीन कामगार संघटनांसह इतर संघटनांचा राजेश लाटकर यांना जाहीर पाठिंबा
By nisha patil - 12/11/2024 8:34:37 PM
Share This News:
तीन कामगार संघटनांसह इतर संघटनांचा राजेश लाटकर यांना जाहीर पाठिंबा
कोल्हापूर: उत्तर विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार श्री. राजेश लाटकर यांना राज्यभर विस्तारलेल्या तीन प्रमुख कामगार संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कामगार कर्मचारी संघर्ष युनियन, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन, अण्णा माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना या संघटनांचा प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी हा पाठिंबा जाहीर केला.
संजय पाटील यांनी सांगितले की, "कोल्हापूर शहरामध्ये सुमारे सातशे बांधकाम कामगार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. आतापर्यंत 3,400 बांधकाम कामगारांना साहित्य आणि भांडी वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिवर्तन संघटना आणि रेशन ग्राहक व दुकानदार संघटनांचा देखील श्री. लाटकर यांना पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे."
सर्व संघटनांचे कार्यकर्ते लाटकर यांच्या प्रचारामध्ये सहभागी होतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
तीन कामगार संघटनांसह इतर संघटनांचा राजेश लाटकर यांना जाहीर पाठिंबा
|