बातम्या
छ.शाहु महाराज यांना रुपाली वायदंडे यांचा जाहीर पाठिंबा - सौ.वायदंडे
By nisha patil - 4/22/2024 3:14:02 PM
Share This News:
कोल्हापूर :प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ करिता
महाराष्ट्रातील ४८ मतदार संघापैकी १२ लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदार संघामध्ये पक्षाच्या वतीने. रुपाताई वायदंडे यांनी निवडणूक लढण्यासाठी जोरदार तयारी केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकरवादी) हा पक्ष नोंदणीकृत असून मा. दिपकभाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर कार्यरत आहे महाराष्ट्रातील १२ लोकसभा मतदार संघासह देशात मतदार संघामध्ये पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. रिपब्लिकन पक्षाचा पाया हाच मुळी शाहू, फुले, आंबेडकर विचारधारा हा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छ. शाहू महाराज यांचे ऋणानुबंध जतन करण्याची पिढीची जबाबदारी आहे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) ने कोल्हापूर पुढच्या ४७ मधील उमेदवार सौ. रुपाताई प्रविण वायदंडे या श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांचे करिता उमेदवारी अर्ज मागे घेत आहेत, पक्षाच्या सुचनेनुसार आज त्यांचा उमेदवारी अर्ज शाहू महाराज छत्रपती ऐयांचे करिता माघार घेण्याची घोषणा केली आहे. डॉ. संपूर्ण देशातील अधिकार भारतीय सर्व जाती - धर्म, पंथ, वंशाच्या शेवटच्या नागरिकाचे हक्क संविधानामुळेच आबाधित राहणार आहेत. हे संविधान मोडण्याचे षडयंत्र करणाऱ्या भाजपाला आणि जातीयवादी शक्तींना पराभूत करणे आवश्यक आहे. रिपब्लिकन पार्टी
ऑफ इंडिया (A) चे मूळ धोरण आहे. त्यामुळे मत विभाजन टाळण्यासाठी महाराष्ट्रामध्ये "महाविकास आघाडीला" पाठींबा जाहीर करत आहात.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) हा पाठींबा बिनशर्त जाहीर करत आहोत. मा. दादासाहेब ओहाळ पक्ष निरीक्षक प. महाराष्ट्र मा. कैलास जोगदंड महाराष्ट्र संघटन सचिव मा. प्रताप बाबर शहराध्यक्ष
रुपाताई वायदंडे तौफीक मुली .नगरसेवक सरदार आमशीक, दयानंद दाभाडे जिल्हाध्यक्ष रुपाली कांबळे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी पुष्पा नलवडे, अमर तांदळे,रणजीत हळदीकर, प्रिया कांबळे, गीता कांबळे, शैलेश सोनुले, प्रदीप लोखंडे, वंदना वायदंडे, माधुरी कांबळे, रंजना कांबळे, आशा धस्ती,छाया कांबळे, आदित्य कांबळे, निखिल कांबळे, गिता माने,राणीताई दाभाडे,जनाबाई कांबळे, सुवर्णा कांबळे, मंगल कांबळे, शोभा कांबळे आदी महिला कार्यकर्ते उपस्थित होते.
छ.शाहु महाराज यांना रुपाली वायदंडे यांचा जाहीर पाठिंबा - सौ.वायदंडे
|