बातम्या

'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित लेखन' या ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा

Publication and discussion of the book Fine Writings of Maharshi Vitthal Ramji Shinde


By nisha patil - 4/20/2024 6:45:14 PM
Share This News:



 

दि. २३ एप्रिल, २०२४ रोजी शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त डॉ. विजया पाटील लिखित 'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित लेखन' या ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा आयोजित केली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत मा. किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते होणार आहे.

तर, प्राचार्य टी. एस. पाटील या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व या ग्रंथाच्या अनुषंगाने मांडणी करणार आहेत. या ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे उपस्थित राहणार आहेत. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवनकार्य महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात उल्लेखनीय आहे. तसेच त्यांचे लेखनही वैचारिक, सांस्कृतिक आणि भाषिक दृष्टीने महत्त्वाचे आहे. महर्षी शिंदे यांच्या ललित लेखनाची चिकित्सक मांडणी करणारा ग्रंथ त्यांच्या जयंतीनिमित्त अध्यासनाच्या  वतीने प्रकाशित होत आहे. तरी सर्वानी दि. २३ एप्रिल, २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात उपस्थित रहावे असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ. रणधीर शिंदे यांनी केले आहे.


'महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे ललित लेखन' या ग्रंथाचे प्रकाशन व चर्चा