बातम्या

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना समर्पित दिनदर्शिकेचे प्रकाशन

Publication of a calendar dedicated to the memory of Chhatrapati Shivarai on the occasion of Rajmata Jijau Jayanti

By nisha patil - 1/13/2025 3:21:15 PM
Share This News:

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना समर्पित दिनदर्शिकेचे प्रकाशन

राजमाता जिजाऊ साहेब यांच्या ४२७ व्या जयंतीनिमित्त ओंकार वेल्फेअर फाउंडेशन तर्फे तयार करण्यात आलेल्या २०२५ च्या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. या दिनदर्शिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जपणाऱ्या ‘सेरोपेजिया शिवरायीना’ या विशाळगड परिसरात नव्याने शोधलेल्या कंदील पुष्प वनस्पतीबद्दल माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अमोल सरनाईक होते, तर सचिव ओंकार मोरे व उपप्राचार्य प्रा. टी.के. सरगर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पेजर ॲकॅडमीचे प्रमुख श्री. अशोक पाटील, राजमाता तरुण मंडळाचे पदाधिकारी, रयत फाउंडेशनच्या अध्यक्षा उज्ज्वला पटेल, संपदा पाटील, संगीता पोतदार यांसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

ओंकार वेल्फेअर फाउंडेशन ने सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थ भावनेने समाजसेवेचा वसा जपला आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त छत्रपती शिवरायांच्या स्मृतींना समर्पित दिनदर्शिकेचे प्रकाशन
Total Views: 48