बातम्या

सोमवारी पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक

Pune Divisional Corruption Eradication Committee meeting on Monday


By nisha patil - 5/6/2024 5:06:55 PM
Share This News:



 पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक माहे जून महिन्याच्या दुस-या सोमवारी दि. 10 जून 2024 रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महसूल विभागाच्या प्रभारी उप आयुक्त वर्षा लड्डा-उंटवाल यांनी दिली आहे.

भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक प्रत्येक तीन महिन्यातून एकदा आयोजीत केली जाते. तीन महिन्यांत आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाय योजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुस-या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते.


सोमवारी पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक