बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार" वितरन

Punyashlok Ahilya Devi Holkar Award distribution


By nisha patil - 1/6/2023 7:12:03 AM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त हातकणंगले पंचायत समिती सदस्या निर्मला माळी व नाभिक समाज महिला तालुका अध्यक्ष पुजा सपकाळ. यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास महाराष्ट्र शासन विभाग आपला ग्रामपंचायत स्तरीय"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार" ग्रामपंचायत सरपंच जयश्री जाधव  हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, प्रकाश पाटील,माजी सरपंच किरण नामे, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव महापूरे, दावीत घाटगे, आप्पासाहेब पाटील संभाजी मिसाळ, अजय देवमोरे, अमरजीत बंडगर, शुभांगी माळी ,विशाखा माळी, सुदर्शन चौगुले ,माधुरी घोदे, शुभांगी माळी, भारती पोतदार, अशोक आरगे तसेच ग्रामस्थ व पदाधिकारी  उपस्थित होते. यावेळी पुरस्कार विजेत्या निर्मला माळी व पूजा सपकाळ यांचा सत्कार ग्रामपंचायत कुंभोज व ग्रामस्थ कुंभोज यांच्यावतीने करण्यात आला.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार" वितरन