बातम्या

फिल्टरचा वापर न करता असे करा ‘पाणी’ शुद्ध

Purify the water without using a filter


By nisha patil - 3/18/2024 7:28:37 AM
Share This News:



सध्या शहरातील सर्रास घरात जास्त पाणी शुद्ध करण्यासाठी वेगवेगळे फिल्टर वापरले जातात. यातून पाणी शुद्ध होत खरं पण जेवढ पाणी शुद्ध होऊन मिळतं, त्यापेक्षा अधिक पाणी वाया जात. आणि पाणी जपून वापरण हे तर सध्या काळाची गरज झाली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि घरगुटू पद्धतीने पाणी शुद्ध करण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जाऊ शकतात.

१) दही आणि खसखस – पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्ही पाण्यात दह्यासोबत खसखस टाकू शकता. खसखसमध्ये पाणी शुद्ध करण्याचे गुण असतात.

२) निरगुडी: निरगुडी हि एक औषधी वनस्पती आहे. पाण्यात निर्गुंडीची पाने ३० मिनिटे टाकून ठेऊन हे पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. तसेच निर्गुडीचा अनेक रोग व दुखण्यांवर गुणकारी औषध म्हणूनही उपयोग होतो.


३) निर्मलीच्या बीया – या झाडाच्या बीया बारीक करून पाण्यात टाका. या बीया पाण्यात २ ते ३ तासांसाठी तशाच राहू द्या. याने पाणी शुद्ध होण्यास होण्यास मदत होईल.

४) शेवग्याच्या शेंगा आणि तुळस – शेंगा आणि तुळशीची काही पाने पाण्यात टाका. हा दूषित पाणी शुद्ध करण्याचा एक चांगला उपाय मानला जातो.

५) जांभुळ आणि अर्जुन झाडाची साल – दूषित पाण्यात जांभुळाच्या आणि अर्जुन झाडाची साल सोबतच काही तुळशीची पाने टाकून रात्रभर टाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून एका भांड्यात भरा. याने पाणी शुद्ध होण्यास मदत होईल.

६) सूर्याची किरणे – दूषित पाणी उन्हात ठेवले तर सूर्याच्या किरणांमुळे पाण्यातील कीटाणू नष्ट होतात. हे पाणीही पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.

७) टोमॅटो आणि सफरचंदाची साल – टोमॅटो आणि सफरचंदाची साल अल्कोहोलमध्ये २ ते ३ तासांसाठी ठेवा. नंतर ही साल उन्हात वाळत ठेवा. सुकल्यानंतर ही साल पाण्यात टाका. पाणी हे २ ते ३ तासांनंतर पाणी पिण्यासाठी वापरलं जाऊ शकतं.

८) केळीची साल – केळीच्या सालीमध्ये पाण्यातील तांबे आणि शीसं यांसारखे धातू नष्ट करण्याचे गुण असतात. त्यामुळे पाणी शुद्ध करण्यासाठी केळीच्या सालीचाही वापर करता येऊ शकतो.

९) लिंबाचा रस – नळाचं पाणी शुद्ध करण्यासाठी त्यात लिंबाचा रसाचा वापर केला जाऊ शकतो. पाण्यात असलेला बॅक्टेरिया लिंबाच्या रसाने ३० मिनिटात नष्ट होतात.


फिल्टरचा वापर न करता असे करा ‘पाणी’ शुद्ध