बातम्या
कोल्हापुरात पाठलाग करून खुनी हल्ला ; तिघां विरोधात गुन्हा दाखल
By nisha patil - 12/26/2023 1:06:15 PM
Share This News:
कोल्हापुरात पाठलाग करून खुनी हल्ला ; तिघां विरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूर : कोल्हापुरातील कळंबा येथे काल रात्री तरुणाचा पाठलाग करून कोणी हल्ला करण्यात आला. यात सौरभ संजय साळुंखे गंभीर जखमी झाला. आमच्या विरोधकांसोबत फिरतोस त्याचा जाब विचारत पूर्व-वैमानस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी त्र्यंबक गवळी ,अमित गवळी, व समीर गवळी या तिघांवर गुन्हा दाखल झाल्याचे जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन दुकान चालवणारा सौरभ साळुंखे हा तरुण काल रात्री तपोवन मैदान परिसरातील प्रदर्शन पाहण्यास गेला होता. तेथून घरी जात असताना साई मंदिर चौकात त्याला तिघांनी रस्त्यात अडविले तो आमच्या विरोधकांच्या सोबत फिरतोस काय असे म्हणून त्याला मारहाण सुरू केली. यानंतर त्र्यंबक गवळी आम्ही गवळी व सुनील गवळी यांनी तलवार व एडक्याने सौरभ वर वार केले. सौरभ ने पहिला वार हाताच्या पंजावर तुटवला त्यानंतर तो पळत जात असताना पाठीमागून फाटलं करत पुन्हा डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने हात आडवा घेतल्याने मनगट अर्धवट तुटले आहे. सौरभ मोठ्याने ओरडत बसल्याने हल्लेखोर तेथून पळून गेले.
जखमी सोरभला रात्री उशिरा सीपीआय रुग्णालयात दाखल केले. तेथूनत त्याला खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले. त्याने जुना राजन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पूर्व वैमनस्यातून हा कोणी हल्ला झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातस्पष्ट झाले असून तिघांचाही शोधून राजवाडा आणि राजारामपुरी पोलिसांकडून सुरू आहे
कोल्हापुरात पाठलाग करून खुनी हल्ला ; तिघां विरोधात गुन्हा दाखल
|