मनोरंजन

रिलीज आधीच 'पुष्पा 2'नं केली बंपर कमाई ; 'बाहुबली 2' आणि 'आरआरआर'ला टाकलं मागे

Pushpa 2' has already made bumper revenue after its release; It left 'Baahubali 2' and 'RRR' behind


By surekha -
Share This News:



रिलीज आधीच 'पुष्पा 2'नं केली बंपर कमाई ; 'बाहुबली 2' आणि 'आरआरआर'ला टाकलं मागे

 अल्लू अर्जुनच्या  पुष्पा-2 या चित्रपटाची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा: द राइज  या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच पुष्पा द रुल हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  आता पुष्पा-2  या चित्रपटानं रिलीज होण्याआधीच कोट्यवधींची कमाई केली आहे. दिग्दर्शक सुकुमार यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचे ऑडिओ राइट्स काही दिवसांपूर्वी  विकले गेले आहेत. 'पुष्पा 2' चे ऑडिओ राइट्स  65 कोटी रुपयांना विकले गेले आहेत.  साउथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2' आणि 'R R R' या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ऑडिओ राइट्स सुमारे 10 कोटी ते 25 कोटींमध्ये विकले गेले होते.  त्यामुळे आता 'बाहुबली 2' आणि 'R R R'  या चित्रपटांचे ऑडिओ राइट्स प्राइजचे रेकॉर्ड पुष्पा-2 या चित्रपटानं तोडलं आहे. काही दिवसांपूर्वी पुष्पा-2 या चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. दोघांच्याही लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. 
पुष्पा-2 या चित्रपटातील लूकचा फोटो अल्लू अर्जुननं ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो खास लूकमध्ये दिसत आहे. फोटोमध्ये अल्लू अर्जुनच्या गळ्यात लिंबाची माळ दिसत आहेत. तसेच या फोटोमध्ये त्यानं भरजरी साडी देखील नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी अशा अल्लू अर्जुनच्या लूकनं त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.


Pushpa 2' has already made bumper revenue after its release; It left 'Baahubali 2' and 'RRR' behind