बातम्या
पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने जागतिक स्तरावर रोवला मानाचा तुरा..
By nisha patil - 12/31/2024 10:40:20 PM
Share This News:
पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने जागतिक स्तरावर रोवला मानाचा तुरा..
22 व्या पामा ग्लोबल अबॅकस स्पर्धेत मास्टर अबॅकसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश...
व्हिएतनाम मध्ये आयोजित कॉम्पिटिशन मध्ये विद्यार्थ्यांची यशस्वी कामगिरी....
व्हिएतनाममध्ये आयोजित 22 व्या पामा ग्लोबल अबॅकस अँड मेंटल अरेथमेटिक कॉम्पिटिशन 2024 मध्ये इचलकरंजीच्या पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर उत्कृष्ट यश संपादन केले आहे. मास्टर अबॅकस संस्थेच्या 17 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आणि आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
या स्पर्धेत वेगवेगळ्या पंधरा देशातून 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत विद्यार्थ्यांना एका मिनिटात 30 गणिते सोडवावी लागली, ज्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा समावेश होता. 1,000 गुणांच्या पेपरला जलद आणि अचूक उत्तर देऊन पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे रोनक पटेल याने चॅम्पियनशिप मिळवली. तर मनसा काबरा यांनी सेकंड रँक मिळवत यश संपादन केले, तर इतर विद्यार्थ्यांनी दुसरे आणि तिसरे रँक मिळवले. ही कामगिरी इचलकरंजीसाठी अभिमानास्पद आहे.
इचलकरंजीतील पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही एक प्रतिष्ठित शिक्षण संस्था आहे. या संस्थेत 3,000 विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अबॅकसचे प्रशिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार पटकावणाऱ्या या संस्थेने आपला लौकिक अधिक उंचावला आहे.
या यशामागे पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका सविता संजय भन्साळी तसेच मास्टर अबॅकस चे संचालक शिवराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.याचबरोबर अंकिता भन्साळी मॅडम आणि संस्थेच्या इतर शिक्षक, पालक याचे देखील या यशात मोलाचे सहकार्य लाभले
पुष्पा ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने जागतिक स्तरावर रोवला मानाचा तुरा..
|