बातम्या

पुष्पा आणि सिंघमची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर: कोण बाजी मारणार ?

Pushpa and Singham clash at the box office


By nisha patil - 12/9/2023 7:40:01 PM
Share This News:



पुष्पा आणि सिंघमची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर:
कोण बाजी मारणार ?

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटाची आणि  अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’  या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. नुकतीच तरण आदर्शन यांनी एक ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे की, अजयच्या ‘सिंघम अगेन’  आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पा-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. आता ‘सिंघम अगेन’ की पुष्पा-2 या दोन्ही चित्रपटांपैकी कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई करेल याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

तरण आदर्श यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, 'CONFIRMED,आता सिंघम अगेन विरुद्ध पुष्पा2 होणार आहे.' तरण आदर्श यांच्या या ट्वीटला कमेंट करुन कोणता चित्रपट जास्त कमाई करेल? याबाबत नेटकऱ्यांनी अंदाज लावला आहे.एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'सिंघम पुन्हा त्याचे 13 वर्षांचे वर्चस्व दाखवणार आहे.' तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं,'मला अजूनही वाटतं अगर पुष्पा 2 आणि सिंघम 3 यांची टक्कर झाली तर  सिंघम 3 ओपनिंग-डेला चांगली कमाई करेल. सिंघमची क्रेझ आहे.'


पुष्पा आणि सिंघमची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर: कोण बाजी मारणार ?