बातम्या
पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By nisha patil - 1/23/2025 2:04:31 PM
Share This News:
पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : ६८ लाखाचा मुद्देमाल जप्त
पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्या वर राज्य उत्पादन शुल्क, मिरज विभागाने कारवाई केलीय. मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रुचून ही कारवाई करण्यात आलीय.
पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्या वर राज्य उत्पादन शुल्क, मिरज विभागाने कारवाई केलीय. पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलीय. बियर, विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण 68 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रुचून सदर कारवाई करण्यात आलीय. राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे, उप-अधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग वरती सापळा लावुन कारवाई करण्यात आलीय.
पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
|