बातम्या
संपूर्ण संपत्ती अभिषेकच्या नावावर करा…
By nisha patil - 12/13/2023 3:46:09 PM
Share This News:
बच्चन कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळ चर्चेत असतं. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. दरम्यान, महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील जुहू येथील ‘प्रतीक्षा’ बंगला लेक श्वेता नंदा हिच्या नावावर केला आहे.अश्या अनेक गोष्टीमुळे बच्चन फॅमिली चर्चेचा विषय बनली आहे.
आता सध्या अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण एक काळ असा होता जेव्हा एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने अमिताभ बच्चन यांची संपूर्ण संपत्ती मुलगा अभिषेक बच्चन याच्यावर नावावर करण्याची मागणी केली होती. सध्या ज्या सेलिब्रिटीच्या आईची चर्चा रंगत ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री करिश्मा कपूर हिची आई बबीता कपूर आहे.सांगायचं झालं तर, ऐश्वर्या हिच्यासोबत लग्न करण्याआधी अभिषेक याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं. अभिनेत्री करिष्मा कपूर आणि अभिषेक यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा फत्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रंगल्या होत्या. करिश्मा कपूर ही बच्चन कुटुंबाची होणारी सून आहे अशी घोषणा देखील अभिनेत्री जया बच्चन यांनी माध्यमांसमोर केली होती.
बच्चन कुटुंबासोबत करिश्मा हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. पण करिश्मा आणि अभिषेक यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. त्यामागे कारण देखील फार मोठं आहे. बच्चन आणि कपूर कुटुंबामध्ये लग्नाची बोलणी सुरु असताना बबीता कपूर यांनी अमिताभ बच्चन यांची संपत्ती अभिषेक याच्या नावावर करण्याची मागणी केली होती.
संपूर्ण संपत्ती अभिषेकच्या नावावर करा…
|