बातम्या
अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ पदार्थ ; उजळेल सौंदर्य
By nisha patil - 3/18/2024 7:27:43 AM
Share This News:
धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना सौंदर्याची काळजी घेता येत नाही. त्यामुळे सौंदर्य झाकोळून जाते. यासाठी काही खास घरगुती उपाय असून यासाठी जास्त वेळही देण्याची गरज नाही. अतिशय सोप्या, साध्या आणि जलद पद्धतीने हा उपाय घरच्याघरी करता येतो. अंघोळीच्या पाण्यात थोडेसे कच्चे दूध मिसळले की तुम्हाला त्याचे चांगले परिणाम काही दिवसांतच दिसून येतील. अंघोळीच्या पाण्यात कच्चे दूध मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. याबाबत आपणे सविस्तर माहिती घेणार आहोत.
हा उपाय करण्यासाठी फक्त पाणी आणि कच्चे दूध लागते. उपाय करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात एक कप कच्चे दूध मिसळून अंघोळ करावी. यामुळे रंग गोरा होतो. तसेच सन टॅनिंग दूर होते. शिवाय केसांची शायनिंग वाढते. कच्च्या दूधामध्ये लेक्टिक अॅसिड, व्हिटॅमिन ए असल्याने त्वचेमध्ये ओलावा राहतो. डायनेस दूर होतो. तसेच चेह-याचा ग्लो वाढतो. दूध आणि पाण्याच्या या उपायासह आणखीही काही सोपे उपाय सौंदर्यवृद्धीसाठी घरच्या घरी करता येऊ शकतात.
केळी, दही, दूध आणि बीन्स सारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. दूध आणि पाण्याचा उपाय करताना जास्त वेळ ठेवलेल्या कच्च्या दूधाचा वापर करु नये. यामुळे दूध खराब होऊ शकते. स्किन आणि केसांवर केमिकलचा वापर करु नये. तीव्र उन्हात जाणे टाळावे. तीव्र उन्हात गेल्यामुळे सौंदर्यासंबंधीत समस्या अधिक वाढतात, असे तज्ज्ञ सांगतात.
अंघोळीच्या पाण्यात टाका ‘हा’ पदार्थ ; उजळेल सौंदर्य
|