बातम्या

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत गुणवत्तापूर्ण कामगिरी’

Quality Performance of DKTE Students at Saxon University


By nisha patil - 7/8/2023 7:33:00 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी येथील डीकेटीईच्या तृतीय वर्ष टेक्स्टाईल विभागामध्ये शिक्षण घेणारे तीन विद्यार्थी केदार खोत, वैष्णवी बडे व पार्शती भागवत यांची क्रेडिट ट्रान्सफर स्कीम अंतर्गत एका सेमिस्टरसाठी सॅक्सॉन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, नेदरलँड येथे निवड झाली होती. सॅक्सॉन युनिव्हर्सिटी येथे या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेनेे प्रशिक्षण कालावधीमध्ये नेदरलँड मध्ये आपली गुणवत्ता सिध्द केली आहे. या विद्यार्थ्यांच्यामुळे जागतिक पातळीवर डीकेटीईचेच तसेच इचलकरंजीचे नाव उज्वल झाले आहे.
डीकेटीईचे २७ हून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार झालेले आहेत. या अंतर्गत सॅक्सॉन युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, नेदरलँड यांच्याशी शैक्षणिक करार झाला आहे. सॅक्सॉन युनिव्हर्सिटी हे नेदरलँड येथील उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठ आहे.  विद्यार्थी देवाण-घेवाण, उच्च शिक्षणाच्या संधीचे देवाण-घेवाण, तसेच एकत्रित संशोधन करणे, सेमिनार व कार्यशाळा आयोजित करणे अशा अनेक बाबींवर कराराचे दोहोंमध्ये शिक्कामोर्तब झाले आहे.
 

तृतीय वर्षातील सदर विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर क्रेडिट ट्रान्सफर योजनेअंतर्गत निवड झाली होती. याअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध इंडस्ट्रीयल संशोधनात्मक प्रकल्पावर काम केले. या विद्यार्थ्यांना नविन तंत्रज्ञान नवनविन कौशल्य, नविन साफटवेअर, अधुनिक संशोधन शिकण्याची संधी देखील मिळाली. यामुळे नेदरलँड येथील असलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळला. सदर विद्यार्थ्यांनी सॅक्सॉन युनिव्हर्सिटी येथे शिक्षण संपादन करुन  सहाव्या सेमिस्टरची परिक्षा दिली व सातव्या सेमिस्टरसाठी ते डीकेटीई येथे रुजू झाले आहेत. डीकेटीई ही ऍटोनोमास संस्था असल्यामुळे निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मिळालेले मार्कस क्रेडीटच्या स्वरुपात येथील डीकेटीईच्या मार्कशिटमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
 

वस्त्रोद्योगात सातत्याने अधुनिकीकरण होत आहे, त्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.  परदेशातील उद्योगांना भेटी दिल्यामुळे जगात काय चालले आहे याचे ज्ञान विद्यार्थ्यांना होते. यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटरऍक्शन, इंडस्ट्री संशोधनाद्वारे भविष्यामध्ये उज्वल करिअरसाठी लाभ होतो.
 

यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे,संस्थेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ.सपना आवाडे सर्व ट्रस्टी यांनी अभिनंदन केले. सदर यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या प्र.संचालिका प्रा.डॉ.सौ. एल.एस. आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व प्रा.डॉ.एम.वाय. गुडियावर यांचे मार्गदर्शन लाभले.


डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची सॅक्सॉन युनिव्हर्सिटीत गुणवत्तापूर्ण कामगिरी’