शैक्षणिक
आर. वाय. पाटील बापूंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी उपक्रम
By nisha patil - 3/17/2025 4:38:07 PM
Share This News:
आर. वाय. पाटील बापूंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी उपक्रम
जीवन शिक्षण मंदिर व कन्या विद्या मंदिरमध्ये वही वाटप कार्यक्रम
आमचे लाडके नेतृत्व,. आर. वाय. पाटील बापूंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट सामाजिक बांधिलकी आणि एकात्मतेला प्रोत्साहन देणे होते. कार्यक्रमादरम्यान जीवन शिक्षण मंदिर नरतवडे व कन्या विद्या मंदिर नरतवडे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वही वाटप करण्यात आली.
उपक्रमाच्या कार्यक्रमात विविध मान्यवर आणि शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुर्यकांत पाटील . आप्पासाहेब शिंदे, निवृत्ती!! कोगनुळकर, . धोंडीराम चौगले, श्रद्धा पाटील, सुरेखा कुंभार, सुधीर शिंदे, एस.बी. पाटील . तांबोळी!!, विकास पाटील सर, बाजीराव कदमओंकार सावंत, अभिषेक पाटील, ओंकार कुंभार, शुभम कुंभार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी देखील उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले.
उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले गेले असून, नेतृत्वाच्या या उपक्रमामुळे शाळांमध्ये नवीन उमंग आणि ऊर्जा पसरली आहे. सर्वांनी या उपक्रमाला दिलेला पाठिंबा आणि सहभाग प्रशंसनीय असल्याचे नमूद झाले.
आर. वाय. पाटील बापूंच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी उपक्रम
|