बातम्या
शिरुर मतदारसंघात राडा, अमोल कोल्हेंचा संताप
By nisha patil - 5/13/2024 6:52:44 PM
Share This News:
राज्यातील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली असून सायकंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. एकीकडे उन्हाचा कडाका जाणवत असताना दुसरीकडे राजकारणही गरम झालं आहे. त्यातच, महाविकास आघाडीच्या शरद पवार पक्षाचे उमेदवारही चौथ्या टप्प्यात लढत आहेत. शिरुर आणि अहमदनगर मतदारसंघात शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे. खासदार अमोल कोल्हे आणि निलेश लंकेंच्या माध्यमातून शरद पवारांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाली लागली आहे. मात्र, पैसेवाटप, बोगस मतदानाचा प्रयत्न आणि दमदाटीच्या आरोपामुळे हे मतदारसंघात राज्यात चर्चेत आले आहेत.
सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजेंट बनून सरळसरळ थेट मतदान केंद्रात मनमानी कारभार करत आहेत, असे ट्विट करत खासदार कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघात सत्ताधारी पक्षाकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याचे म्हटले आहे.
शिरुर मतदारसंघात राडा, अमोल कोल्हेंचा संताप
|