बातम्या

"राधानगरी-भुदरगड-आजराचा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे? ए. वाय. पाटील यांचे नाव चर्चेत"

Radhanagari Bhudargarh Ajra constituency to Shiv Sena Uddhav Thackeray group


By nisha patil - 10/19/2024 10:14:18 PM
Share This News:



राधानगरी-भुदरगड-आजराचा विधानसभा मतदारसंघ सध्या मोठ्या राजकीय घडामोडींनी गाजत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, राधानगरीतील कार्यकर्त्यांच्या प्रचंड मागणीमुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) या मतदारसंघात ए. वाय. पाटील यांचे नाव शिफारस करणार आहे. स्वर्गीय पी. एन. पाटील यांनी ए. वाय. पाटील यांना दिलेला शब्द आणि त्यांच्या संकल्पनांवर आधारित या निर्णयाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

येत्या काही दिवसांत ए. वाय. पाटील यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राधानगरी-भुदरगड-आजराच्या राजकीय समीकरणांवर परिणाम होईल, अशी चर्चा आहे. कार्यकर्त्यांमध्येही याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.


"राधानगरी-भुदरगड-आजराचा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे? ए. वाय. पाटील यांचे नाव चर्चेत"