बातम्या

चंदुर येथे बौद्ध समाजाच्या वतीने राहुल आवाडे यांचा सत्कार

Rahul Awade felicitated on behalf of the Buddhist community at Chandur


By nisha patil - 12/8/2024 12:10:13 PM
Share This News:



इचलकरंजी : चंदुर बौद्ध समाजाच्या वतीने पूरग्रस्त परिस्थितीमध्ये पुरबाधीत भागात किंबहुना प्रत्येक आपत्तीजनक परिस्थितीमध्ये चंदूर गावास कायम स्वरुपी मदत करित असलेले इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे नेते जिल्हा परिषद सदस्य डॉ.राहुल आवाडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच चंदूर गावचे भाग्यविधाते, संकटमोचक, हातकणंगले पंचायत समितीचे मा. सभापती महेश पाटील दादा , ग्रामपंचायत सरपंच स्नेहल कांबळे वहीणी, नुतन उपसरपंच स्वाती कदम वहीणी तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल बी.व्ही. कांबळे साहेब, मा.उपसरपंच संदीप कांबळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी यांचा सत्कार करण्यात  आला.

या कार्यक्रमानिमित्त उपस्थित हातकणले पंचायत समितीचे माजी सभापती धुळा आण्णा पुजारी, वडगाव बाजार समितीचे उपसभापती जगोंडा पाटील तात्या, ग्रामपंचायत सदस्य संजय जिंदे साहेब,मारुती पुजारी, भाऊसो रेंदाळे, पै.सचिन पुजारी, सचिन हळदे, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पाटील वहीणी, बी.जी.चांदूरकर साहेब,माजी ग्रामपंचायत सदस्य संजय चांदूरकर ,बाळासाहेब कांबळे, देमोजी कांबळे ,ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, बौद्ध समाज माता भगिनी बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले तर आभार कार्यक्रम चे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी केले.


चंदुर येथे बौद्ध समाजाच्या वतीने राहुल आवाडे यांचा सत्कार