राजकीय
इचलकरंजीत चर्चेचा केंद्रबिंदू राहुल आवाडेचं..
By nisha patil - 11/22/2024 9:53:57 PM
Share This News:
इचलकरंजीत चर्चेचा केंद्रबिंदू राहुल आवाडेचं..
कार्यतत्परतेच्या जोरावर विजयाचे दावे भक्कम
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ यंदा सर्वाधिक चर्चिला जाणारा ठरला आहे. महायुतीच्या वतीने भाजपचे उमेदवार राहुल आवाडे हे या निवडणुकीत सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे नेते आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्याशी तुलना करता राहुल आवाडे हे अधिक मताधिक्याने इचलकरंजी मतदारसंघावर निवडून येण्याची शक्यता माnली जात आहे.
महायुतीच्या भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या राहुल आवाडे यांना मतदारसंघातील जनतेचा भरभरून पाठिंबा मिळाला आहे. तो त्यांच्या मजबूत जनसंपर्कमुळे व तुम्ही पण कार्यप्रणालीमुळेच अधिकाधिक मताधिक्याने विजय मिळवतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मतदारसंघातील अनेकांनी राहुल आवाडे यांच्या कार्यक्षमतेला पाठिंबा दर्शवला असल्याचं बोललं जात असून. "राहुल आवाडे हेच इचलकरंजीच्या विकासाला नवा गती देणारे नेतृत्व ठरतील," असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.
सर्वांच्या नजरा आता निकालावर आहेत, मात्र आतापासूनच आवाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. इचलकरंजीतला हा निवडणूक निकाल जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांवर महत्त्वपूर्ण ठरेल, असे दिसत आहे.
इचलकरंजीत चर्चेचा केंद्रबिंदू राहुल आवाडेचं..
|