बातम्या

चंदुर येथील स्थलांतरित पूरग्रस्तांना राहुल आवाडे यांचा मदतीचा हात

Rahul Awade lends a helping hand to the migrant flood victims of Chandur


By nisha patil - 12/8/2024 4:51:20 PM
Share This News:



इचलकरंजी : पूरपरिस्थितीचा फटका इचलकरंजीसह आजूबाजूच्या गावांना बसला होता. अशा परिस्थितीत मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांनी चंदूर येथे  स्थलांतरीत झालेल्या पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिल्याबद्दल मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांचे आभार मानून सत्कार केला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी माजी पंचायत समिती सभापती महेश पाटील, सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच स्वाती कदम, ग्रामपंचायत सदस्य वैशाली पाटील, धुळाप्पा पुजारी, जागोंडा पाटील, बाळासो कांबळे, संजय जिंदे, मारुती पुजारी, ग्रामविकास अधिकारी बाळासो कांबळे, भाऊसो रेंदाळे, सचिन पुजारी, सचिन हळदे, सुधाकर कदम, कुमार कांबळे, बी जि चांदूरकर, देमाजी कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.


चंदुर येथील स्थलांतरित पूरग्रस्तांना राहुल आवाडे यांचा मदतीचा हात