बातम्या

राहुल आवाडे ठाकरे गटात जाणार...?

Rahul Awade will join the Thackeray group


By nisha patil - 3/29/2024 2:36:41 PM
Share This News:



जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत हे त्या दोन दिवसात ते मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत गुरुवारी कोल्हापूर झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे..
 

आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीतच ही बैठक झाली. त्यामुळे हातकलंगले मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता बळावली आहे. गेल्या दोन निवडणुकांपासून आपण तयारी करतोय पण प्रत्येक वेळी थांबवले जाते किती दिवस दुसऱ्यांच्या विजयासाठी राबायचे. आता माघार नाही राहुल आवारे यांनी हातकलंगले मतदारसंघातून अपक्ष म्हणून नेमणुकीच्या रिंगणात उतरावे अशी मागणी जाहीर बैठकीत करण्यात आली. शिवसेनेने ही जागा लढवाची ठरवली तर प्रसंगी त्यांची मशाल हातात घ्या पण निवडणूक लढवा असा दबाव पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांच्यावर आणला आहे. दोन दिवसात वर्षांची चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करू अशा शब्द आमदारावाडे आणि पदाधिकाऱ्याना दिला आहे


राहुल आवाडे ठाकरे गटात जाणार...?