बातम्या
इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर आम. डॉ. राहुल आवाडे यांची ठाम भूमिका..
By nisha patil - 11/3/2025 5:28:17 PM
Share This News:
इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर आम. डॉ. राहुल आवाडे यांची ठाम भूमिका..
अपूर्ण कामासाठी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी....
महाराष्ट्र विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात इचलकरंजीचे आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी शहराच्या पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न विधिमंडळात उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. शहरातील कृष्णा पाईपलाइन योजना अद्याप अपूर्ण असून, कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना पाण्यासाठी तडफडावे लागत आहे, असा मुद्दा त्यांनी सभागृहात जोरदार मांडला.महत्त्वाचे मुद्दे मांडताना, आमदार राहुल आवाडे यांनी सांगितले की, "कृष्णा पाईपलाइन योजनेचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला त्वरित काळ्या यादीत टाकण्यात यावे." तसेच, 2022 मध्ये मंजूर झालेली सुळकुड पाणीपुरवठा योजना अद्याप राजकीय कारणांमुळे रखडली आहे, याकडेही त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
इचलकरंजीच्या पाणीप्रश्नावर आम. डॉ. राहुल आवाडे यांची ठाम भूमिका..
|