बातम्या

काळे झेंडे दाखवत कोल्हापुरात राहुल गांधींचा निषेध..

Rahul Gandhi protests in Kolhapur showing black flags


By nisha patil - 5/10/2024 8:55:59 PM
Share This News:



भाजप कार्यकर्त्यांनी आज खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध आक्रमक निदर्शने करत, काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध व्यक्त केला. "राहुल गांधी कोण रे, पायतान मारा दोन रे" अशा आक्रमक घोषणांनी शहर दणाणून गेले. संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा धिक्कार असो आणि संविधान बदलू पाहणाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केला.

राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या या आंदोलनाने राजकीय वातावरण अधिकच तापवले आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की, संविधानाचा अवमान करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत माफ केले जाणार नाही.


काळे झेंडे दाखवत कोल्हापुरात राहुल गांधींचा निषेध..