बातम्या

टीम इंडियाचा प्रशिक्षक पदावरून राहुल ने दिला राजीनामा...?

Rahul resigned from the post of coach of Team India


By nisha patil - 11/23/2023 6:17:06 PM
Share This News:



  भारतीय क्रिकेट संघानं  विश्वचषक  स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे आणि सुरुवातीपासून सेमीफायनलपर्यंत एकही सामना न गमावता पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान कायम ठेवलेलं. मात्र, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर मोठ्या शिताफिनं मात केली आणि विजय मिळवला. रोहितसेनेसह  140 कोटी भारतीयांच्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. टीम इंडियाच्या विश्वचषकातील प्रवासात सर्व खेळाडूंसोबतच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड  यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं तब्बल 12 वर्षांनी वर्ल्डकपची सेमीफायनल मॅच जिंकली आणि थाटात फायनल गाठली. 
          यंदाच्या विश्वचषकासोबतच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना हा राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील शेवटचा सामना होता. अशा परिस्थितीत राहुल द्रविड भविष्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कायम राहणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड स्वतः टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहण्यास इच्छुक नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 
      राहुल द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला आहे. पण आता त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि तो भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास, हे शक्य होणार नाही, त्यामुळे राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्यास इच्छुक नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नक्की राहुलला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे  हेच कारण कि टीम इंडिया फायनल मध्ये हारली म्हणून निराश झाला आहे असे तर्क वितर्क सोशल मीडियावर लावले जात आहेत आता नक्की खार काय कारण आहे हे राहुलच सांगू शकतो हे नक्की...


टीम इंडियाचा प्रशिक्षक पदावरून राहुल ने दिला राजीनामा...?