बातम्या

राहुलदादा महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

Rahuldada Mahadiks birthday was celebrated with various social activities


By nisha patil - 5/10/2024 8:53:06 PM
Share This News:



भडकंबे, ता. वाळवा — सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेचे सचिव, तसेच महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुल महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

भडकंबे येथे आयोजित कार्यक्रमात अहोरात्र सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा सेविका, महावितरण कर्मचारी, तलाठी कार्यालयातील अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच स्थानिक पत्रकार यांचा सन्मान भेटवस्तू देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या निमित्ताने अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये रविंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी, राजारामबापू पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील, वसंतराव माळी, दिपक बनसोडे, तानाजी जगताप, दत्तात्रय माळी, बजरंग मोरे, सुरेश पाटील, वसंत लोंढे, कृष्णात बागणे, अमोल पाटील, शिवाजी माळी, ऋषीकेश पाटील, अजय पाटील, विकास पाटील आदींचा समावेश होता.

या कार्यक्रमात स्व. वनश्री नानासाहेब महाडिक यांच्या विचारांचा वारसा राहुल महाडिक आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे नेला आहे, याबद्दल कौतुक करण्यात आले. तसेच सहकार, उद्योग, राजकारण, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात महाडिक कुटुंबीयांची मोलाची भूमिका असल्याचेही सांगण्यात आले. "महाडिक युवा शक्तीचे संघटन मजबूत करू" अशी भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली.
 


राहुलदादा महाडिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा