विशेष बातम्या

राहुलचा घात की अपघात...?

Rahuls attack or accident


By nisha patil - 6/16/2023 4:36:36 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी  हातकणंगले तालुक्यातील  तारदाळ येथील रेल्वे रुळाजवळ राहुल कोळी या तरुणाचा मूर्तदेह आढळून आला आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली .याबाबत राहुल याचा भाऊ सचिन कोळी आणि शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. राहुलच्या डोक्यात मोठी जखम असल्याने त्याचा तपास व्हावा असे फिर्यादेत  म्हटले आहे. त्यामुळे हा खुन असल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुलला दारूचे व्यसन होते तो प्लंबिंग चे काम करत होता ,बुधवारी रात्रीपासून तो घरातून गायब होता. कामावर जाणाऱ्या कामगारांना त्याचा मूर्तदेह रेल्वे रुळाजवळ दिसला, घटनास्थळी  गर्दी झाली घटनास्थळी पोलीस उपाध्यक्ष समरसिंग साळवे शहापूर पोलिस सहाय्यक निरीक्षक अभिजीत पाटील यांनी पाहणी केली, तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मूर्तदेह हातकणगले ग्रामीण रुग्णालयात पाठवला. राहुलच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून  त्याचा खून करून रेल्वे रुळावर टाकून आत्महत्येचा बनाव केला असावा .असा संशय आहे. राहुलचा खून की आत्महत्या यावर चर्चा सुरू असून त्याचा खून झाला असावा असे ठाम मत मांडले जात आहे.तारा न्यूज साठीइचलकरंजी हून विनोद शिंगे


राहुलचा घात की अपघात...?