बातम्या
रेल्वे दुहेरीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण करणार : राम करण यादव
By nisha patil - 12/26/2023 12:31:03 PM
Share This News:
रेल्वे दुहेरीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण करणार : राम करण यादव
कोल्हापूर : पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील वर्षभरात दुहेरीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुणे - कोल्हापूरला जोडणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या सुरू होतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी दिली
कोल्हापूर रेल्वे स्थानकाची यादव यांनी आज पाहणी केली स्थानकाच्या मदतीनीकरणाचे काम समाधानकारक आहे. हेरिटेज लूक तसाच ठेवून हे काम पूर्ण होणार आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पुणे विभागीय प्रबंधक इंदू दुबे यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मिरज रेल्वे स्थानकातील दुरुस्तीच्या कामामुळे कोल्हापुरातील बहुतांश गाड्या बंद आहेत या पार्श्वभूमीवर आज महाव्यवस्थापक यादव कोल्हापुरात आले होते त्यांच्यासाठी जी एक स्वतंत्र रेल्वे येथील राजश्री शाहू टर्मिनस वर संध्याकाळी सहा वाजता आली. नवीन तिकीट काउंटर प्रतीक्षा कक्ष याच्यासह त्यांनी अण्णा बांधकामाची ही पाहणी केली त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या नव्या बांधकामा नंतर प्रवासांचे चार चाकी वाहन थेट प्लॅटफॉर्मपर्यंत नेता येणार आहे याबद्दल यादव यांनी समाधान व्यक्त केले त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
नवे रेल्वे गाड्या बद्दल ते म्हणाले कोल्हापूर पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. पुढील वर्षात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर नव्या रेल्वे गाड्या ही सुरू होतील. विविध पॅसेंजर रेल्वे या डिझेल वरून विजेवर चालवण्याचे काम सुरू असून, कोल्हापुरातील पॅसेंजर ही लवकरच विजेवर धावू लागतील. कोल्हापूरच्या रेल्वे स्थानकाच्या मदतीने करण्याचे काम चांगले सुरू आहे या स्थानकाचा हेरिटेज लोक तसेच ठेवून हे नूतनीकरण होणार आहे.
यानंतर त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले व ते मुंबईला मार्गस्थ झाले यावेळी विकास श्रीवास्तव वाणिज्य प्रबंधक डॉक्टर मिलिंद हिरवे, यातायात प्रबंधक स्वप्निल नेला, स्टेशन प्रबंधक राजन मेहता ,रेल्वे प्रवासी संघटनेचे शिवनाथ बियाणे, गजाधर मानधना, जयेश ओसस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते
रेल्वे दुहेरीकरणाचे काम वर्षभरात पूर्ण करणार : राम करण यादव
|