बातम्या

रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

Railway employees will have a sweet Diwali


By nisha patil - 10/24/2023 4:26:18 PM
Share This News:



रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड 

दसरा आणि दिवाळीनिमित्त महागाई भत्त्यात होणार वाढ

रेल्वे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के

11 लाख कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ


दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली आहे. रेल्वे विभागानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

यावर्षी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे . दसरा आणि दिवाळीनिमित्त, रेल्वे बोर्डानं आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिली आहे. रेल्वे विभागानं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं यंदाची रेल्वे कर्मचाऱ्यांची दसरा आणीबदिवाळी गोड होणार हे नक्की... रेल्वे कर्मचाऱ्याचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के झाला आहे. हा. याबाबतचा निर्णय  रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अखिल भारतीय रेल्वे आणि उत्पादन युनिट्सचे महाव्यवस्थापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी यांनी  घेतला 
     

जुलै 2023 पासून आतापर्यंतची थकबाकी कर्मचाऱ्यांना दिली जाणार असल्याची माहिती रेल्वे बोर्डाने आपल्या अधिसूचनेत दिली आहे. ही थकबाकी पुढील महिन्याच्या पगारीसह जमा केली जाईल.


रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड